Posts

दोन किनारे (भाग -5)

                                           ५ सौरभ सकाळी लवकर  उठला .पटापट तयारी केली .कॅब बुक करायला म्हणून मोबाईल हाती घेतला . पाहतो तर मानसीचा मेसेज  ."मला भेटल्याशिवाय जाऊ नकोस मी येते सकाळी भेटायला " साडेपाच वाजले होते.. कॅब बुक करावी तोपर्यत येईलच मानसी असा विचार करुन  त्याने कॅब बुक केली तेवढ्यात बेल वाजली. सौरभ ने दार उघडलं... समोर मानसी उभी  होती.. मानसी आत येताच सौरभच्या गळ्यात पडून हमसाहमशी रडू लागली. सौरभने तिला मनसोक्त रडू दिले... तो फक्त तिच्या डोक्यावरून हात फिरवीत होता. तिला हात धरून खुर्चीवर बसविले... "शांत हो मानसी. का रडतेस? अगं तुझा माझ्यावर विश्वास नाही का? " "आहे ना, कदाचित स्वतः वर जेवढा नाही त्यापेक्षा जास्त तुझ्यावर आहे.. पण नशिबावर नाही. परिस्थितीवर नाही. मला फार भीती वाटते रे " "अगं, तुझा माझ्यावर विश्वास आहे ना.. मग बस " "अचानक इतक्या  गोष्टी  माहिती पडल्या की मला भीतीच वाटायला लागली. तुझे आईबाबा आपलं नातं स्वीकारत...

दोन किनारे (भाग -4)

                                         4                  मानसीकडून आल्यापासून सौरभला फार अस्वस्थ वाटत होत .मानसीकडे खाणं झाल्यामुळे तशी भूक नव्हती आणि इच्छाही नव्हती .किचन मध्ये जाऊन कडक कॉफी केली .कॉफीचा मग घेऊन तो बालकनित बसला .थंड वारा वाहत होता .नेहमी गरम कॉफी आणि बालकनित बसून कॉफीचा आस्वाद घेणे त्याचा आवडता छंद .त्याने आकाशाकडे पहिलं बहुतेक पौर्णिमा असावी .टपोर चांदण पडलं होतं ...थंड हवा अंगाला झोंबत होती पण त्याला आज काहीच आवडत नव्हतं .                  रोज ओळखीचे वाटणारे आकाशातील चंद्र ,तारे सगळेच त्याला अनोळखी वाटत होते .असं वाटतं होतं आजवर आपल्याला जे  दिसत होतं ते तसं नव्हतंच कदाचित .नेहमी ओळखीचे वाटणारे ,ज्यांना आपण जन्मापासून ओळखतो ते सुद्धा अनोळखी भासत होते .त्यांनाही आपण पूर्णपणे ओळखू शकलो नाही . राहू...

दोन किनारे (भाग -3)

                                       3      सायंकाळी पाच वाजता दोघी मायलेकी सौरभ ची वाट पाहत बसल्या होत्या .बरोबर पाच वाजता बेल वाजली .मानसी ने दार उघडलं . उंच पुरा सौरभ दिसायला रुबाबदार होता .गोरा रंग,कुरळे केस ,किंचित भुरे डोळे ...पाहताक्षणी कुणावरही छाप पडेल असच त्याचं व्यक्तिमत्व होतं. अगदी साधं टीशर्ट आणि जीन्स घातलेला असूनही तो आकर्षक दिसत होता . ये ,सौरभ ...बस .सोप्याकडे बोट दाखवत मानसी म्हणाली . सौरभ ने प्रवेश करताच सभोवार नजर फिरविली . छोटासा वन बेडरूम किचन फ्लॅट ... हॉल मध्ये आटोपशीर फर्निचर ...छोटासा हॉल पण सुंदर रीतीने सजविला होता .कोपऱ्यात एक छोटा टेबल होता . त्यावर सुंदरसा फ्लॉवरपॉट  आणि त्याच्या बाजूला एक छानशी फोटोफ्रेम होती .त्यात  नर्सिंगच्या ड्रेस मधील तीन मैत्रीणीचा फोटो होता त्याला काहीतरी ओळखीचा भास झाला .जरा निरखून पाहावं म्हणून समोर जाणार तेवढ्यात मानसी म्हणाली,"बस हं!मी पाणी आणते ". आणि तो सोप्यावर बसला . ती पाणी घेऊन आली ...त्...

दोन किनारे (भाग -2)

2 मानसी जेवायला ये . डायनिंग टेबल वर जेवायला बसलेल्या मानसीच्या आईने तिला आवाज दिला . मानसी जेवायला बसली खरी पण तिला जेवणच जात नव्हते .थोडंस खाऊन ती बेडरूममध्ये गेली . मानसीची आई सर्व आवरून,दुधाचा ग्लास घेऊन  तिच्या बेडरूममध्ये आली. "मानसी ...काय झालं ? न जेवताच उठली ..तिच्या केसांवरून हात फेरीत आई म्हणाली . "हे घे दूध पी ... "नकोय मला ..उठून बसत मानसी म्हणाली ". "तुला माझा राग येतोय का? अग पण मी तुझ्या भल्यासाठीच म्हणते बेटा .हे बघ लग्न नेहमी बरोबरीतच व्हायला हवे " "आई ,पण सौरभ ला काही प्रॉब्लेम नाही ...त्याच्या आईबाबांना काही प्रॉब्लेम नाही तर तुला का असावा ? आई मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही ...नाही जगू शकत त्याच्याशिवाय म्हणून आपल्या आईच्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागली ". "मी तुला रडू नकोस म्हणणार नाही ...रडून घे ..पूर्ण आयुष्य माझ्यासारखे राडण्यापेक्षा आताच रडून घे " रडता रडता मानसी शांत झाली . "काय म्हणतेस आई?मला कळलं नाही ". "हे बघ बेटा लग्न नेहमी बरोबरीत व्हावे...मी तुला सांगितलं की तुझे बाबा तू जन्माच्य...

दोन किनारे (भाग -1)

दोन किनारे भाग-१ सौरभ कॅफे मध्ये मानसीची वाट पाहत बसला होता...सायंकाळी  साडे सात ला भेटू असं ठरलेलं... आठ वाजत आहे अजून कशी आली नाही? मनाशीच विचार करीत दहादा हातातील घडाळ्याकडे पाहत होता. वेटर दोन दा विचारून गेला ऑर्डरबद्दल.. फोन लावला तर फोन पण उचलत नव्हती...एकदा फोन करून बघावा म्हणून फोन काढला तितक्यात लांबून मानसी येताना दिसली . मुळातच सुंदर असलेली मानसी ,निळ्या रंगाच्या स्लीवलेस शॉर्ट वनपीस ड्रेस मध्ये अधिकच खुलून दिसत होती .तिचा रेखीव चेहरा ,उंच बांधा आणि त्याला साजेसे ड्रेसिंग सगळ्यांचे लक्ष वेधून घेत होते .सौरभने मुद्दाम कोपऱ्यातील टेबल घेतला होता जेणेकरून थोडा एकांत लाभेल ..टेबलपर्यंत येईपर्यंत सगळ्यांनी एकदातरी तिच्याकडे वळून बघितलं . "सॉरी ...वेळ झाला "अस म्हणत ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसली . सौरभ ने तिच्या चेहऱ्याकडे बघितलं ...खूप सुंदर दिसत होती परंतु चेहरा किंचितसा ओढल्यासारखा दिसत होता ..कुठेतरी दुःखाची छटा दिसत होती . "इट्स ओके डिअर!काय घेतेस मग ,वेटर दोन दा येऊन गेला ". "काही नको,कॉफी घेऊ फक्त" "अग,काहीतरी घेऊ या ना " ...

सोशल डिस्टंसिंग सोसेना

आज राहुल येणार म्हणून मानसी खूप आनंदी होती. जवळपास पाच महिन्याने  राहुल येणार होता. कधी एकदा ऑफिस संपते आणि कधी एकदा घरी जाते असं झालं होत तिला. एकदाचे पाच वाजले आणि ऑफिस सुटलं.. तिने गाडी काढली.गाडी चालवताना  विचार करू लागली ,'किती दिवस झाले ना?मार्च मध्ये गेला आणि लॉकडाऊन  झालं .अडकूनच पडला , येताच आलं नाही .विचारानेच डोळ्यात पाणी आलं . डोळ्यातील अश्रू पुसत गाडी चालवू लागली . मानसी दवाखान्यात डॉक्टर म्हणून काम करायची आणि राहुल पोलीस इन्स्पेक्टर .दुसऱ्या शहरात त्याची अलीकडेच बदली झाली होती .दर शनिवारी रविवारी घरी यायचा .अचानक कोरोना आला आणि त्यांच येणंच बंद झालं  .पोलीस विभागाची जबादारी बघता त्याला सुट्या मिळेना आणि लॉकडाऊन मुळे वाहतूक व्यवस्था बंद त्यामुळेही येता  येईना .एकदाची बस सेवा सुरू झाली आणि आज चक्क पाच महिन्याने घरी येणार होता. गाडी चालवताना मानसीने घड्याळात पाहिले .साडेपाच वाजले, आला असेल राहुल असा विचार करून तिने गाडीचा वेग वाढविला. घरी आली तर राहुल तिचीच वाट पाहत होता.घरी पोहचताच ती आधी सरळ बाथरूम मध्ये गेली . कोरोना आल्यापासून हॉस्पिटल मधून य...

देहादान (एक प्रेमकथा )

#देहादान_एक_प्रेमकथा  कॉलेजमध्ये डॉ.रोहितचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.  अधि ष्ठाता,त्यांच्या  महान कार्याचा परिचय करून देत  होते. त्यांचे शिक्षण, त्यांनी घेतलेला विविध उपक्रमातील सहभाग हे  सगळे सांगताना ते किती उदारमतवादी आहे हे सांगत होते. ते इतके उदारमतवादी आहेत की त्यांनी आपल्या प्रिय पत्नी सुमनच्या पार्थिव शरीराची कुठलीही धार्मिक  विधी न करता देहदान केले.तिची  सगळी मालमत्ता अनाथालयाला दान केली. सुजाता, सुमनची मैत्रीण श्रोत्यांच्यामध्ये बसली होती. तिच्या  तळपायाची आग मस्तकात गेली. "किती खोटा वागतो हा माणूस. किती मुखवटे लावतो चेहर्‍यावर. मेल्यावर सुद्धा तिचा वापर करण्याचे सोडत नाही " ती विचारतच घरी पोहचते. सकाळी पेपरमध्ये डॉक्टर रोहितचा फोटोसोबत त्याच्या सत्काराची मोठी बातमी होती.ती वाचून तिला सुमनची आठवण आली.  तिला सुमनचा चेहरा डोळ्यासमोर दिसू लागला.. सुमन अणि सुजाता सायन्स कॉलेजमध्ये प्रयोगशाळा सहाय्यक   होत्या.सुमन दिसायला सुंदर, साधी, मनमिळाऊ मुलगी . सुमनचे  पोस्टिंग केमेस्ट्री लॅबमध्ये . तीचं काम म्हणजे केमिस्ट्री ल...