लास्ट किस
# अर्चना धवड
लास्ट किस
(बाप- लेकीचे प्रेम........... तिची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी काहीही करणारा बाप...)
रोहित अदितीच्या लग्नाचा फोटो अल्बम पाहत होता़ अदिति रोहितची मुलगी. अशा वेगवेगळ्या पोझ मधील नवरीचे फोटो तो पहिल्यांदाच बघत होता. नंतर फिरायलाला गेल्यावरचे फोटो. अदिती किती आनंदी दिसत आहे. ते बर्फातले वेगवेगळ्या पोझ मधील फोटो आणि शेवटचा हॉस्पिटल मधील फोटो. अदिती रोहितच्या मांडीवर डोके ठेवून अणि तो तिच्या कपाळाची पापी घेतोय आणि तीच ते स्माइल. रोहितला अदितिचे शब्द आठवले लास्ट किस बाबा.लास्ट किस.
रोहीतला हुंदका अनावर झाला. रोहित रडू लागला. मागे कविता रोहितची बायको त्याच्या खांद्यावर हात ठेवून सांत्वना देत होती. त्याच्या डोळ्यासमोर भूतकाळ आला.
रोहित अणि रोहिणी बी. टेक ला सोबत होते. दोघांचही एकाच कंपनी मध्ये कॅम्पस सेलेक्शन झाले. रोहिणी दिसायला सुंदर. दोघांची मैत्री प्रेम व नंतर लग्न. लग्नानंतर वर्षभरात रोहिणीला दिवस गेलेत. दोघेही खूप आनंदात होते. रोहित रोहिणी ची खूप काळजी घेत होता. रोहिणीनी एका गोड मुलीला जन्म दिला. अचानक काय झाले काही कळायच्या आत रोहिणी चा मृत्यू झाला. एका दिवसाच पिल्लू हातात देऊन रोहिणी कायमची निघून गेली.
रोहित खूप खचून गेला . त्याला दुःख करायला पण वेळ नव्हता कारण बाळाला सांभाळण्याची जबाबदारी रोहित वर आली होती. बाळाचे नाव अदिती ठेवले. दिवसभरासाठी बाई ठेवली होती. परंतु रात्री रोहितला सांभाळावे लागत
होते. कधीकधी तर रात्रभर जगावं लागत होत. त्याला त्याची व रोहिणीची मैत्रीण कविता खूप मदत करायची. कविता त्याच्याच कंपनीत काम करायची. आणि त्याच्याच फ्लैट शेजारी रहायची. अदिती ला सांभाळताना रोहितला तिची खूप मदत व्हायची. ती रोहित वर एकतर्फी प्रेम करु लागली होती.
अदिती वर्षाची झाल्या नंतर जेव्हा ती रडायची रोहित तिला लग्नाचा अल्बम दाखवायचा. ती एकदम चुप व्हायची. आता रोहित ती रडली की तिला लग्नाचा अल्बम द्यायचा. ती खूप मन लावून फोटो पहायची. जस जसी मोठी होत होती तस तसी ती फोटो बारकाईने पहायची. पाच, सहा वर्षाची झाल्यावर तर ती म्हणायची
..... बाबा.... या आईच्या शालू चा रंग थोडा आणखी डार्क हवा होता...... ये बाबा मला माझ्या लग्नात डार्क घेऊन देशील.......
ये बाबा आईच्या गळ्यातील नेकलेस मैच नाही झाला. माझ्या लग्नात किनई बाबा छान मैचिंग घेऊन देशील.....
ती रोहित शी तु मी असच बोलायची.
रोहित तिला कडेवर घ्यायचा. अणि म्हणायचा
हो रे माझ्या पिल्लू मी तर माझ्या परी साठी डायमंड सेट घेईल.
आता तिला अल्बम पहायचे वेड लागले होते. घागरा, लाचा तिला प्रचंड आवडायचा. दर वाढदिवसाला ती लाचा , लेहंगा असे ड्रेस घ्यायची. ड्रेसिंग टेबल समोर तयार व्हायची. ड्रेसिंग टेबल मध्ये बरेच से रोहिणी चे समान तसेच होते. ती आईच्या बांगड्या, टिकली,अस काय काय लावायची अणि म्हणायची बाबा मी दिसते ना नवरी......
हो रे माझ्या सोन्या..... अणि तिला जवळ घेऊन पापी घ्यायचा.....
तिच लग्न अणि नवरी याच आकर्षण वाढत होत.
आता ती रोहित सोबत कुणाच्या ही लग्नात जायला जिद्द करायची. तिथे गेल्यावर ती नवरी कडे टाक लावून पहायची. घरी आल्यावर म्हणायची.
बाबा नवरी ची हेयर स्टाइल मला नाही आवडली. माझ्या लग्नात तर आपण चांगल्या ब्युटीशियन ला बोलवू.
रोहित ला तिच्या बोलण्याचे कौतुक वाटायचे अणि तो तिचा लाड करायचा. जस जसी ती दिवसेंदिवस मोठी होत होती तसतसे तिचे लग्न नवरी याचे आकर्षण वाढत होते. ती रोहित चा ती जीव की प्राण होती. तिची प्रत्येक इच्छा तो पूर्ण करायचा.
आता ती दहा वर्षाचा झाली होती. तरीही अल्बम पाहणे सुरूच होते. अभ्यासात हुशार होती. शाळेच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन मध्ये नेहमी नवरीच व्हायची. कधी महाराष्ट्रीयन तर कधी गुजराती. आता तर ती आमच्या दोघांच्या च्या फोटो वर पण कमेंट करायची....
बाबा हा आईचा अणि तुझा फोटो आहे ना खूप छान आहे. मला खूप आवडतो पण बाबा त्या बर्फात आई तुझ्या छातीवर डोके ठेवून आहे अणि तू नुसता पाहत आहे. तू कपाळावर किस करायला हव होत. फोटो मधे काय जिवंतपणा आला असता न बाबा.....
आदी आता हे अति होतय अस नाही वाटत तुला. तू आज काल जास्त बोलायला लागलीस......
बाबा त्यात काय आहे. मी लाडात आली की मी तुला कीस करते ना अणि तु तर कितीदा किस करतो. शाळेत सोडताना, शाळेतून आल्यावर झोपायला जाताना.
बाबा... धिस इस गूड टच बाबा गुड टच .
ती रोहित ला समजाऊन सांगत होती. रोहित ला तिच्या भाबडेपणा चा खुप लाड आला त्याने तिला जवळ घेतले अणि कपाळाची पापी घेतली. हे बघ बाबा धिस ईस गूड टच . अणि बाबा मी माझ्या नवर्या सोबत फिरायला जाईल ना तेव्हा बघशील माझे फोटो. अणि हा तुझा अणि आईचा फोटो आहे ना असा मी काढणारच पण किस करताना अणि मुद्दामून रोहित ह्य कपाळावर किस केले. रोहित नी हलकीशी टपकी तिच्या डोक्यावर दिली अणि म्हणाला माझ्या पिल्लूच्या लग्नात सगळे तिच्या मनासारखं करेल. आता बस... ठेवा तो अल्बम अणि अभ्यास करा.
कविता बरेचदा रोहित कडे यायची. कधीकधी रोहित ला काही काम असले तर तो अदिती ला कविता कडे सोडायचा. अशीच एकदा ती कवीता कडे गेली होती.
ती कविताला म्हणाली आंटी तू लग्न का नाही करीत.
अग आदु कुणी भेटायला तर हवा ना....
माझा बाबा आवडतो ना तुला...... तु माझ्या बाबांशी का नाही करत लग्न....... ..
ह्म्म..... मला तुझा बाबा आवडतो ग. पण त्याला मी आवडायला हवी ना.
तु सांगितले कधी बाबाला की मला तु आवडतो म्हणून.
मग कस कळणार त्याला. मी पहा कशी बोलते. मनातल सगळं सांगून टाकते.
आदु तु लहान आहे. तुला नाही कळणार. चल हे घे चाॅकलेट. आणि आपल होमवर्क कर.
अशाप्रकारे दोघ बाप लेक मस्त मजेत जगत होते. अणि अचानक एक दिवस अदिति चक्कर येऊन पडते. तिला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात येते. डॉक्टर चेक अप करतात. ब्लड टेस्ट सीटी स्कैन, एम आर आय., अशा अनेक तपासण्या झाल्या. ब्रेन ट्यूमर चे निदान झाले. डॉक्टर नी कैंसर लास्ट स्टेज मध्ये असल्याचे सांगितले. डॉक्टर नी सांगितले की फक्त दोन महिने तुमच्या हातात आहे. तोपर्यंत ही एकदम नॉर्मल राहील. दोन महिन्यानंतर एक तर कोमात जाईल नाहीतर.......... डॉक्टर नी पुढचे बोलणे टाळले.
रोहित ला ऐकून प्रचंड धक्का बसला. सोबत कविता होती. ती त्याला धीर देत होती. डॉक्टर म्हणाले जो पर्यंत आहे तोपर्यंत तिला आनंदाने जागु द्या. तिच्या सगळ्या इच्छा पूर्ण करा. रोहित ओरडला....
डॉक्टर तिच्या सर्व इच्छा पूर्ण करू. दोन महिन्यात? डॉक्टर तिला लग्न करायचे आहे. तिला फिरायला जायचे आहे. तिला नवरी व्हायचे आहे. हे सगळे होईल दोन महिन्यात. अणि मोठ्याने रडू लागला. देवा मी काय पाप केले आधी रोहिणी आता अदिति. त्यापेक्षा देवा मलाच का नाही घेऊन जात . तो कविता च्या कुशीत शिरून ओक्साबोक्शी रडू लागला. थोड्या वेळा ने शांत झाला. तोंड धुतले अणि चेहरा व्यवस्थित करून केबिन च्या बाहेर आला. बाहेर अदिती बसली होती. घरी जाताना कार मध्ये तिघेही जण शांत शांत होते. अदिती शांतता तोडत बोलली. बाबा काय झाले. एवढे शांत का.
काही नाही बेटा.....
बाबा कुछ तो बात है.....
.................
बाबा डॉक्टर नी सांगितले ले सगळे ऐकले. बाबा डॉक्टर म्हणाले ना दोन महीने आहे ना.... मग आपण धमाल करू या.
बाबा तसही मला आईसोबत रहायला नाही मीळाल ना. आता मी आई कडे रहायला जाणार.
रोहित च्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अदिती ने रोहित चे डोळे पुसले.
बाबा माझी एक इच्छा पूर्ण करणार... मला लग्न करायच आहे. माझ लग्न करणार ना? आणि फिरायला ला जायच आहे स्वीत्झरलॅडला. आपण सोबत कविता आँटी ला घेऊ.
अग पण नवरा मुलगा.......
बाबा तू. बाबा मला तुझ्या शी लग्न करायचे आहे.
अग आदु काय बोलतेस तु हे.
बाबा माझ्याकडे फक्त दोन महिने आहेत. माझी शेवटची इच्छा पूर्ण नाही करणार तु.
रोहित ला तिला दुखवायचे नव्हते म्हणुन हो पाहू असे म्हटले.
हे बघ बाबा लग्नात हळदी मेहंदी संगीत सगळं करायचं. मला सगळ एन्जॉय करायच आहे बाबा. बाबा माझे कन्यादान कोण करणार. आपण कविता आन्टी च्या आई बाबाला सांगु.
अदिती ने अशी सगळी योजना आखली होती.
रोहित ला खूप अस्वस्थ वाटू लागले. त्याला अदिती चे लहानपणापासून चे लग्नाचे आकर्षण आठवले. त्याला फार वाईट वाटल की आपण तिची इच्छा पूर्ण शकत नाही. त्यानी ही गोष्ट कविता ला बोलून दाखवली. कविता म्हणाली
हे बघ आपण अदिती च लग्न करू. नंतर आपण स्वित्झर्लंड ला जाऊ फिरायला .. माझा एक मित्र इवेंट मैनेजर आहे. तो आपल्याला लग्नाची तयारी करून देईल. आपण फक्त आपल्या मित्र मैत्रिणींना बोलवू. त्यांना अदिती ची परिस्थिती माहिती आहे. अणि हे बघ लोक काय म्हणतील हा विचार आपण करायचा नाही. आपल्याला अदिती ची इच्छा पूर्ण करायची आहे.
.....
रोहित नी अदिती ला सांगितले की आपण तुझ लग्न करू या.
खरच बाबा...... अदिती चक्क ओरडली.
पण हळूच म्हणाली कुणासोबत......
माझ्यासोबत.............
अदिती रोहित च्या गळ्यात पडली. आय लव यू बाबा. ......
चल आता पटकन लग्नाच्या तयारीला लागा. तयार हो आपल्या ला खरेदी करायची आहे.
रोहित कविता अणि अदिती नी लग्नाची खरेदी सुरू केली. अदिती म्हणाली बाबा तु तर नवरदेव तु पण छान ड्रेस घे. अग मला कशाला. माझ्याकडे खूप सूट आहेत.
अदिती म्हणाली
बिलकुल नाही.... नवरदेव मला शोभायला नको.
ठीक आहे मैडम......
अणि कविता आंटी मी जसा शालू घेणार ना तसाच तुलाही घ्यावा लागेल.....
मला कशाला...... माझ्याकडे खूप साड्या आहेत. कविता म्हणाली
नाही... तुला सेम टू सेम तसाच शालू अणि दागिने घ्यावे लागेल. तू तर आमच्या दोघांची मैत्रीण आहे. आणि करवली पण आहे. आणि मला आई पण नाही. तुला तिन्ही जबाबदार्या पार पाडायच्या आहेत तेव्हा तू तर एकदम खास दिसायला पाहिजे. आदिती ने स्पष्ट केल.
लग्नाची सर्व तयारी झाली. अदिती ला हळद लागली. सोबत करवली म्हणून कवितालाही लावली. संगीतच्या कार्यक्रमात अदिती खुप नाचली. अदिती खुप एन्जॉय करीत होती.
लग्नाचा दिवस उजाडला. अदिती खुप छान दिसत होती. तिनी सगळे शालू, दागिने, चप्पल सगळे आपल्या पसंतीनुसार घेतले होते. अणि जबरदस्तीने कविता ला पण घ्यायला लावले होते. मुलीशी लग्न करण त्याला पटत नव्हते पण अदिती चा आनंदासाठी तो सर्व करीत होता.
. कविता अणि अदिती दोघीही तयार झाल्या होत्या. दोघिही अप्रतिम सुंदर दिसत होत्या. जणू एक मोठी नवरी व एक छोटी नवरी. तयार झाल्यावर तिनी खूप वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढले. लग्नाच्या आधीचे सगळे विधी करून घेतले. सगळे विधी करताना ती कविता ला सोबत ठेवी कारण कविता करवली होती तिकडे रोहित चे पण नवरदेव म्हणुन सगळे विधी झाले. लग्नाची वेळ झाली. अंतरपाट धरला गेला. ईकडे अदिती कविता सोबत उभी होती. रोहित ला कसे तरी होत होते. तो मुलीच्या प्रेमापोटी सगळे करीत होता. मंगलाष्टक सुरू होणार त्याआधी नवर्या मुलीच्या ओंजळीत अक्षदा देतात. भटजींनी अदितिला हात समोर करायला सांगितला. अदिती बाजूला झाली अणि तिनी कविता ची ओंजळ पुढे केली. सगळे आवक होऊन पाहात राहिले. ती बाजूला झाली अणि म्हणाली.......
....................
बाबा तुझ्या पिल्ल्याला एवढे कळते की बाबा सोबत लग्न करायचे नसते. बाबा मला माहीत आहे कविता आंटी च तुझ्यावर खूप प्रेम आहे. बाबा तुझही आहे पण तुला माझ्यामुळे विचार करायला वेळच मिळाला नाही.
बाबा मी गेल्यावर माझा बाबा एकटा पडायला नको. तिनी कविता चा हात रोहित च्या हातात दिला.
रोहित अणि कविता चे लग्न झाले.
दुसर्या दिवशी तिघे जण स्विटजरलैंड ला रवाना झाले. तिघानी धमाल मस्ती केली. तिनी आपल्या बाबांसोबत खूप फोटो काढले. ती म्हणाली आता आई अणि तुझा आहे तसा फोटो काढायचा. तीने त्याच्या छातीवर डोके ठेवले अणि म्हणाली बाबा माझ्या कपाळावर किस कर. रोहित च्या डोळ्यातून पाणी आले.
बाबा तू माझा फोटो खराब करतोस. स्माइल प्लीज.
कविताला म्हणाली आंटी छान फोटो आला पाहिजे. आई बाबाच्या फोटो पेक्षाही छान........
त्यांनी ती ट्रीप खूप एन्जॉय केली अणि भारतात परत आले.
दोनमहिने होत आले होते आता रोहित ला भीती वाटत होती आणि एक दिवस अदिती चक्कर येऊन पडली. रोहित नी तिला हॉस्पिटल मध्ये भर्ती केले. डॉक्टर म्हणाले तिची शेवटाची वेळ आली आहे. कविता अणि रोहित भेटायला गेले. अदिती कसनुसं हसली. रोहितला म्हणाली बाबा माझ्याजवळ बस . रोहित तिच्या उषा जवळ बसला. बाबा तू कीती चांगला आहे. माझ्या प्रेमापोटी तु माझा वेडा हट्ट पुरविलास. आय लव्ह यू बाबा. . तिनी डोक त्याच्या मांडीवर ठेवल. बाबा स्विटजरलैंड मध्ये काढला तसा फोटो काढायचा. बाबा लास्ट किस. रोहितने तिच्या कपाळाची पापी घेतली. अणि कविता ला म्हणाली लास्ट क्लिक आंटी. कविता स्माइल प्लीज़ म्हणाली. अदिती नी गोड स्माइल दिल. कविता नी फोटो काढला. रोहित च्या लक्षात आले की अदिती रोहित पासून दूर दूर तिच्या आई ला भेटायला निघून गेली आहे. रोहित नी हाताने अदिति चे डोळे बंद केले.
माझी कथा आवडली असल्यास प्लीज लाइक कमेंट अणि शेयर
*****,,, *******,,,, ********,, *******
©अर्चना अनंत धवड
सदर कथेच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व हक्क लेखिकेकडे राखीव.कथेत अथवा लेखिकेच्या नावात कोणचाही बदल अथवा कथा लेखिकेच्या नावाशिवाय आढळून आल्यास तो काॅपीराईट कायद्याचा भंग असेल ह्याची कृपया नोंद घ्यावी.
कथा जशी आहे तशी शेअर करण्यास हरकत नाही.
धन्यवाद 🙏🙏🙏
Comments
Post a Comment